Today’s Horoscope 08 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 08 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शुक्रवार.

08.09.2023.

शुभाशुभ विचार-चांगला दिवस.

आज विशेष- सामान्य दिवस.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र- मृग 12.10 पर्यंत नंतर आर्द्रा.

चंद्र राशी – मिथुन.

——————————–

मेष – ( शुभ रंग- राखाडी )

प्रॉपर्टी विषयक मोठे आर्थिक व्यवहार आज टाळा. प्रवासात काही नवीन नाती जुळतील. आज काही अति हुशार मंडळी ही संपर्कात येतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

वृषभ (शुभ रंग- मोतिया )

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. मृदू वाणीने विरोधकांनाही आपलेसे कराल. आज नेत्यांची वक्तव्य जनमानसांवर प्रभाव टाकतील. आशादायी दिवस.

मिथुन (शुभ रंग- हिरवा )

आज कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा प्रयत्न राहील. इतरांची टिंगल टवाळी करण्याचा आनंद घ्याल. महत्त्वाच्या चर्चेत आज आपलेच घोडे पुढे दमाटवाल.

कर्क (शुभ रंग- चंदेरी)

बेरोजगारांना घरापासून लांब नोकरीच्या संधी येतील. अधिकारी वर्गाला कार्यालयीन कामासाठी प्रवास घडू शकतात. दुकानदारांनी उधारी उसनवारी टाळावी.

सिंह (शुभ रंग- मरून)

आनंदी व उत्साही असा दिवस असून काही दुरावलेली नाती जवळ येतील. काही भाग्यवान मंडळींना नव्या घराचा ताबा मिळेल. अपूरी स्वप्ने साकार होतील.

कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळावीच लागेल. मित्रमंडळींना आज दोन हात लांब ठेवलेले बरे.

तूळ ( शुभ रंग- निळा)

नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम मोडून चालणार नाहीत. वरिष्ठ आपल्यावर खूषच आहेत अशा भ्रमात राहू नका. मनशांती साठी आज सत्संगा शिवाय दुसरा पर्याय नाही.

वृश्चिक (शुभ रंग- लाल)

आज आपल्या मर्यादेत राहिलेले बरे. धाडसाची कामे आज टाळलीत तर बरे होईल. सासुरवाडी कडून एखाद्या लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताने घ्या.

धनु- (शुभ रंग- पिस्ता)

भागीदारीच्या व्यवसायात देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा. वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी मनाला आनंद देतील. दूरच्या प्रवासात काही वेळ खोळंबा संभवतो.

मकर ( शुभ रंग- क्रीम )

ध्येयप्राप्ती साठी तुमचे अथक परिश्रम चालू असून तब्येतीकडे मात्र तुमचे दुर्लक्ष होत आहे. आज तुम्हाला विश्रांतीची गरज भासेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत हमखास यश मिळेल.

कुंभ (शुभ रंग – पांढरा)

उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढतील. विद्यार्थी पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. आज सहकुटुंब एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. छान दिवस.

मीन -(शुभ रंग – सोनेरी )

आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस असून आज तुम्हाला कुठेही न जाता घरी आराम करावासा वाटेल. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावर घेतील. मुलांच्या शिस्तीस प्राधान्य द्यायला हवे.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क- 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.