Pimpri News : क्रांतिसूर्य’ महानाट्य पाहताना प्रेक्षकांना अश्रू अनावर

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात (Pimpri News) आलेल्या ‘क्रांतिसूर्य’  या महानाट्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा त्यागपूर्ण संघर्षमय इतिहास डोळ्यांसमोर उभा केला. या महानाट्यात दाखवण्यात आलेल्या त्यागमूर्ती माता रमाईंनी त्यांच्या जीवनात केलेल्या त्यागाचे आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात सोसलेल्या हालअपेष्टांचे प्रसंग पाहून उपस्थित प्रेक्षकांना अश्रू अनावर झाले. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनात केलेल्या विविध महान कार्यांच्या प्रसंगाने उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले.

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात महानगरपालिकेच्या वतीने दि. 11 ते 15 एप्रिल 2023 दरम्यान पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. या विचार प्रबोधन पर्वाच्या  पाचव्या दिवशी अंतिम सत्रात पिंपरी येथील एच ए मैदानावर सायंकाळी क्रांतीसुर्य – क्रांतीसुर्य की छाया मा रमाई या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते.

हे महानाट्य पाहण्यासाठी  अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप,आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा विचार प्रबोधन पर्वाचे मुख्य संयोजक डॉ. पवन साळवे, उपआयुक्त  रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसदस्य मारुती भापकर, गोरक्ष लोखंडे, माजी नगरसदस्या चंद्रकांता सोनकांबळे, माजी कार्यकारी अभियंता शरद जाधव, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम गायकवाड, निवृत्ती आरवडे, संदिपान झोंबाडे, भाऊसाहेब आडागळे, धम्मराज साळवे, संतोष जोगदंड, विनोद गायकवाड, शाम सोनवणे,राहुल सोनवणे, संतोष शिंदे,वासिम कुरेशी, अभिजीत डोळस, विनोद सकट, विशाल कांबळे, अनिल सूर्यवंशी, संजय बनसोडे, अनिता साळवे यांच्यासह हजारोच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

Chinchwad : महिलेच्या पर्स मधून दिड लाखांचे दागिने चोरीला

दरम्यान, दुपारच्या सत्रात  महापालिकेने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्रातून प्रशिक्षण घेऊन  नागरी सेवेमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पिंपरी, सांगवी, यमुनानगर, चिंचवड, वाकड,भोसरी, रहाटणी अशा आठ ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि महापालिकेच्या ग्रंथालयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रंथपालांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, उपआयुक्त  मनोज लोणकर, कनिष्ठ अभियंता विजय कांबळे, डॉ.किशोर खिलारे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम गायकवाड, गणेश भोसले,  उत्तम कांबळे, गोरक्ष लोखंडे, धम्मराज साळवे यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

सकाळच्या सत्रामध्ये सुप्रसिद्ध गायक विशाल ओव्हाळ  आणि धीरज वानखेडे यांचा गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच गायिका संगीतविशारद प्रज्ञा इंगळे आणि ख्यातनाम गायक धम्मानंद शिरसाट यांचा संगीतमय कार्यक्रम पार पडला. दुपारच्या सत्रामध्ये “कशाला मागे सरायचं” हा पद्मश्री नामदेव ढसाळ आणि कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितांवर आधारित दोन अंकी नाटक आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी ख्यातनाम गायक प्रा.डॉ.गणेश चंदनशिवे आणि चेतन चोपडे प्रस्तुत महा संगीताचा आंबेडकरी जलसा “तुझ्या पाऊलखुणा” हा गीत गायनाचा कार्यक्रम पिंपरी येथील एच ए मैदानावर संपन्न झाला

शुक्रवारी भव्य रोजगार मेळावा

17 ते 19 एप्रिल 2023 दरम्यान पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे महापालिका आणि बानाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार युवक युवतींसाठी स्वयंरोजगार व उद्योजकता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  21 एप्रिल रोजी भव्य रोजगार मेळावा घेण्यात (Pimpri News) येणार आहे. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.