Pimpri : एन आय पी एम पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर आयोजित वेस्टर्न रिजन कॉन्फरन्स 2024 ला उस्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट पिंपरी चिंचवड चाकण चाप्टरच्या वतीने वेस्टर्न रिजन कॉन्फरन्स चे 17 फेब्रुवारी रोजी वाकड येथे आयोजन करण्यात ( Pimpri)  आले होते.

Rajendra Patni : भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

यावेळी एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एम एच राजाप्रमुख पाहुणे व एनआयपीएम चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी एनआयपीएम पिंपरी-चिंचवड चाकण चाप्टर चे चेअरमन नवनाथ सूर्यवंशी जनरल सेक्रेटरी अभय खुरसाळे, अतिथी प्रशांत कोरे, विभागीय उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, राष्ट्रीय समिती सदस्य अमोल कागवाडे, कॉन्फरन्स चेअरमन सतीश करंजकर, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी बस्वराजू कॉन्फरन्स समन्वयक श्रीकृष्ण गंदे आदी उपस्थित होते.

 

कॉन्फरन्स चेअरमन सतीश करंजकर यांनी या कॉन्फरन्सचे आयोजन व दिवसभरातील चर्चासत्र यांच्या संदर्भात माहिती दिली. राष्ट्रीय समिती सदस्य अमोल कागवाडे यांनी पिंपरी-चिंचवड चाकण चाप्टरची स्थापना व त्यामागील पार्श्वभूमी त्यांनी याप्रसंगी मांडून चाप्टरच्या भावी कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.

 

दिवसभराच्या कॉन्फरन्स मध्ये वेगवेगळ्या विषयावरील चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते पहिले सत्र हे यशस्वी व प्रभावी एच आर एम साठी उपयुक्त धोरणे या विषयावर महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीचे सी एच आर ओ राजेश्वर त्रिपाठी यांनी उत्तम मार्गदर्शन केले. दुसरे सत्र उद्याला आज आकार देण्यासाठी एच आर नेतृत्वासाठी होणारे परिवर्तन या विषयावर संपन्न झाले.

 

या चर्चासत्राचे नेतृत्व टाटा मोटर्स स्मार्ट सिटी मोबिलिटी सोल्युशनचे एचआर प्रमुख सरफराज मनेर यांनी केले व या चर्चासत्रात मुबेआ ऑटोमोटिव्ह कंपोनंट्सचे प्रायव्हेट लिमिटेड मॅनेजिंग डायरेक्टर के डी सिंग व वेबसतो रूप सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे प्रेसिडेंट व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. विकास प्रसाद यांनी सहभाग घेऊन या विषयावर सखोल रित्या चर्चा करून मार्गदर्शन केले.

 

डिजिटल युगात एच आर चे भवितव्य नेविगेट करणे या विषयावरील तिसऱ्या चर्चा सत्राचे नेतृत्व बी एन वाय मिलियन इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट व एच आर इन्फोटेक असोसिएशनचे मेंटॉर बळीराम मुटगेकर यांनी केले. या चर्चासत्रात वेगिले सॉफ्टवेअर सोल्युशनचे को फाऊंडर व सीईओ तुषार आचार्य टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस चे एच आर जनरल मॅनेजर शेखर कांबळे एपी मोहनर चे सीएचआरओ मोहित भोसीकर तसेच राखी देशपांडे यांनी सहभाग घेतला.

 

एच चार बिजनेस पार्टनर्स म्हणून एचआरएम च्या समस्या या विषयावरील चौथ्या चर्चा सत्राचे नेतृत्व सकाळ मीडिया ग्रुपचे सीएचआरओ विनोद बिडवाईक यांनी केले व या चर्चासत्रात भारत फोर्स लिमिटेड चे एच आर आणि आय आर चे संचालक डॉक्टर संतोष भावे पॅनासोनीक लाईफ सोल्युशन से इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आकाश सांगोळे सेफलर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे व्हाईस प्रेसिडेंट एच आर शंतनू घोषाल बेसिको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड इंडिया व साऊथ आफ्रिका एचआर संचालक डॉक्टर उज्वल भट्टाचार्य यांनी या चर्चासत्रात सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.

 

पाचवे सत्र हे इंडस्ट्रियल रिलेशन्स मध्ये गतिशील होणारे बदल या विषयावर संपन्न झाले या चर्चासत्राचे नेतृत्व इंडस्ट्रियल रिलेशन्स या विषयावरील तज्ञ महेश करंदीकर यांनी केले या चर्चासत्रात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट विजय नायर आमदार व युनियन लीडर भाई जगताप,  ॲड. आदित्य जोशीकेलविन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीपाद खरे यांनी या चर्चासत्रात सहभागी होऊन मार्गदर्शन केले.

प्रत्येक सत्राच्या शेवटी उपस्थितांच्या शंकांचे समाधान करण्यात आले. या कॉन्फरन्सला अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ महिंद्रा अँड महिंद्रा इगतपुरी व चाकण प्लांट हेड संजय क्षिरसागर,एन आय पी एम च्या राष्ट्रीय खजिनदार अमृता तेंडुलकरएमआयएलएस चे सह सचिव शशांक साठेबालाजी इन्स्टिट्यूटएमआयटी इन्स्टिट्यूटप्रतिभा इन्स्टिट्यूटजेएसपीएम इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक व टीपीओ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

 

ही कॉन्फरन्स यशस्वी करण्यासाठी या कॉन्फरन्सचे को-चेअरमन व पुणेकर न्यूज ग्रुपचे कन्सल्टिंग एडिटर आणि जनरल अफैर्स- टीकम शेखावत तसेच एनआयपीएम पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर चे संस्थापक अमोल कागवाडेचेअरमन नवनाथ सूर्यवंशीजनरल सेक्रेटरी अभय खुरसाळेखजिनदार प्रदीप मानेकरव्हाईस चेअरमन किशोर शिंदेसतीश पवारअतिरिक्त जनरल सेक्रेटरी चेतन मुसळे,

 

एक्झिकेटीव्ही कमिटी मेंबर राहुल निंबाळकरमधुकर सूर्यवंशीरमेश बागलसावित्री गोसलवाडअर्जुन मानेशितल इंगळेश्वेथा तसेच माजी चेअरमन तुषार टोंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले . या कॉन्फरन्स मध्ये एक हजाराहून अधिक एच आर क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवून त्यांची कॉन्फरन्सला उपस्थिती लाभली कॉन्फरन्सचे सूत्रसंचालन सविथा शेट्टी यांनी केले तर उपस्थितांचे आभार अभय खुरसाळे ( Pimpri)  यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.