Rajendra Patni : भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

एमपीसी न्यूज – भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन झाले ( Rajendra Patni ) आहे . मुंबई येथे आज (शुक्रवार दि. 23)  सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले . ते 59  व्या वर्षांचे होते.  गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने भाजपसह राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे.

Talawade : तळवडे आगीच्या  दुर्घटनेतील मृत व जखमींच्या नातेवाईकांना मदतीचा हात

वाेशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघातून ते भाजपचे आमदार होते.  देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. पाटणींच्या निधनाने भाजपसह राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे. राजेंद्र पाटणी हे 1997  ते 2003  या काळात शिवसेनेकडून विधान परिषदेवर आमदार होते. त्यानंतर 2004  (शिवसेनेकडून), तर 2014 आणि 2019 मध्ये भाजपकडून असे तीन वेळा कारंजा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वर  पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.

ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण ( Rajendra Patni ) करतो.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.