Pimpri : देशी-विदेशी दारूसाठ्यावर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – देशी-विदेशी दारू आणि गावठी दारू तयार(Pimpri) करण्यासाठी वापरण्यात येणारी शेगडी, सिलेंडरच्या साठ्यावर पिंपरी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यात 61 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. 13) रात्री सव्वादहा वाजता भाटनगर पिंपरी येथे करण्यात आली.

दिनेश भाट उर्फ डीके (वय 30, रा. भाटनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गणेश करपे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talegaon : मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर फाकटकरांचे उपोषण मागे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यात देशी विदेशी दारूचा माल, गावठी दारू तयार करण्याचे रसायन व गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी गॅस शेगडी, 14 लिटरचा सिलेंडर असा एकूण 61  हजार 215 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी (Pimpri) जप्त केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.