Pimpri : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

एमपीसी न्यूज – भारतीय राज्यघटनेचे ( Pimpri ) शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्ताने  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , पिंपरी- चिंचवड शहराच्या वतीने अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. पिंपरी चौकातील शुक्रवारी (दि.14)  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संघ कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय  जिल्हा संघचालक विनोद बन्सल, जनकल्याण समितीचे विनोद देशपांडे, महेंद्र बोरकर, नरेंद्र पेंडसे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व स्वयंसेवक, समरसता मंचाच्या पाणपोई चे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल, सांगवी गट संघचालक लक्ष्मण पवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पंजाब मोंढे, बाळासाहेब सुबंध उपस्थित होते.

समरसता मंचातर्फे पाणपोई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी  रा.स्व. संघाच्या समरसता विभागाच्या वतीने शहरात विविध कार्यक्रम, व्याख्यान, उपक्रमांच्या आयोजनासोबतच पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्थानी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सामाजिक समरसता मंच व स्व.तात्या बापट स्मृती समिती यांचे वतीने पाणपोईची सोय देखील करण्यात येत असते.

Pimpri : देशी-विदेशी दारूसाठ्यावर पोलिसांचा छापा

 1989 पासून कोरोना प्रादुर्भावाचा दोन वर्षाचा अपवाद वगळता गेल्या 30 वर्षांपासून ही अविरत सेवा सुरू असल्याचे समरसता मंचच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.  अभिवादन स्थळी येणाऱ्या नागरिकांनी या पाणपोईचा लाभ घेतला. याच बरोबर पर्यावरण संरक्षण गतिविधि तर्फे हरित घर उपक्रमाची प्रदर्शनी लावण्यात ( Pimpri ) आली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.