Pimpri : प्रकाशतात्या जवळकर यांची पिंपरी चिंचवड निवृत्त सेवक परिषद अध्यक्षपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज –   प्रकाशतात्या जवळकर यांची एकमताने पिंपरी चिंचवड निवृत्त सेवक( Pimpri) परिषदेच्या 2023  ते 2026 या तीन वर्ष कालावधीसाठी अध्यक्षपदी निवड झाली आहे.

प्रकाश लक्ष्मण जवळकर हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागामधून सहाय्यक आरोग्याधिकारी या पदावरुन जानेवारी 2011 मध्ये सेवा निवृत्त झाले. त्यांनी  पिंपरी चिंचवड म न पा अधिकारी,कर्मचारी पतसंस्थेचे दोन वेळा संचालक आणि तीन वर्षे सचिव या पदावर काम केले.  सध्या ते पिंपरी चिंचवड सेवा निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील सर्व सेवा निवृत्त धारक या संघटनेचे सभासद असून सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असेन. तसेच म न पा च्या वतीने दि.15 डिसेंबर 2023 रोजी आचार्य अत्रे नाट्यमंदिरात *पेन्शनर डे* मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल ,असे जवळकर यांनी यावेळी सांगितले.

BJP : बलशाली भारत घडवण्याच्या राष्ट्रकार्यात योगदान द्या – शंकर जगताप

याप्रसंगी म न पा चे गणेश विपट,श्री माळी,श्री संजय देसाई, यशवंत चासकर गुरुजी, चंद्रकांत झगडे, काशिनाथ झाडे,आलमगीर नाईकवाडी, प्रल्हाद गिरीगोसावी सर,श्रीकांत मोने, श्रीराम परबत, गोविंद खवासखान,विजया जीवतोडे,शैलजा कुलकर्णी,तानाजी अंकुशराव,शांताराम वाळूंज,नामदेव तारु,दिपक रांगणेकर,अमृत आबनावे, रमेश डोंगरे, रमेश इनामदार, श्रीमंत लोहोकरे, अशोक अहेरराव,रमेश सोनवणे, वसंतराव कदम आदी परिषदेचे मान्यवर सभासद उपस्थित ( Pimpri) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.