Pimpri : सिंधी नाट्य अभिनय शिबिराची उत्साहात सांगता

एमपीसी न्यूज – सेंट्रल पंचायत पिंपरी आणि पिंपरी सिंधी थिएटर (Pimpri) अकॅडमी यांच्या वतीने 14 ते 16 एप्रिल या कालावधीत सिंधी नाट्य आभिनय शिबीर घेण्यात आले. सिंधी भाषेला अभिनय आणि नाट्य या माध्यमातून घराघरात पोहोचविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये 27 महिला, पुरुषांनी सहभाग घेतला.

अहमदाबाद येथील हरेश किकवानी आणि मिस हनी यांनी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. तीन दिवस सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या कालावधीत हे प्रशिक्षण शिबीर झाले. शिबिराच्या समारोप प्रसंगी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे डॉ. विनीता बसंतानी, ज्योती मसंद, सुनील सुखवानी हे होते.

Chakan : चाकण पतसंस्था निवडणूक झाली एकतर्फी

सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष शिवांदास पम्नानी, इंदर बजाज, श्रीचंद नागरानी, मनोहर जेठवाणी, अजित कंजवानी, महेश मोटवानी, भगवान् खतरी, नारायण नाथानी, दिलीप बसंतानी, प्रकाश् मसांद, किकवानी मस हनी, हरेश किकवानी यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी नारायण नाथानी यांनी परिश्रम (Pimpri) घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.