Pimpri : विष्णू मनोहर ह्यांची ‘विष्णूजी की रसोई’ आता पिंपरीत सुरु

एमपीसी न्यूज – सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांच्या विष्णूजी की रसोई या महाराष्ट्रीयन आणि पंजाबी भोजनाचा आस्वाद महाराष्ट्रभर प्रसिध्द आहे. विष्णूजी की रसोई हा प्रकार सर्व सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारा त्याचबरोबर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या जिभेचे चोचले पुरविणारा खाद्य प्रकार आहे. विष्णूजी की रसोई नागपूर, औरंगाबाद, पुणे येथील दहा वर्षांचा अपार यशानंतर पिंपरीतील खवय्यांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त सुरु झाले आहे, अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी दिली.

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, बीग बी अमिताभ बच्चन, मराठमोळा अभिनेता नाना पाटेकर, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा अनेक दिग्गज नेते, अभिनेत्यांसाठी विविध पदार्थ बनवून खाऊ घालून प्रशंशा मिळविलेले आणि सलग 53 तासात 750 हून अधिक शाकाहारी पाककृती बनवून गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ज्यांची नोंद झाली आहे. ते प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर आता पिंपरी-चिंचवड मधील शाकाहारी खवैय्यांना ‘विष्णूजी कि रसोई’ तून भेटणार आहेत.

  • ‘विष्णूजी की रसोई’ हा महाराष्ट्रीयन आणि पंजाबी भोजनाचा ब्रँन्ड महाराष्ट्रभर प्रसिध्द आहे. नागपूर, औरंगाबाद, पुण्यातील खवैय्यांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे ‘विष्णूजी की रसोईचे’ नेहरुनगर-झिरो बॉईज चौक पिंपरी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुरु झाले आहे. शुक्रवारी (दि. 8 मार्च) विष्णू मनोहर यांच्या हस्ते मैत्री केटरर्सच्या पूर्व जोशी, दिपंकर भाकरे, शिरीष जोशी, उदय भाकरे यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन करण्यात आले.

महाराष्ट्रीयन व पंजाबी असे दोन्ही खाद्य पदार्थ पारंपारिक पध्दतीने पानांत दिले जातात. या ब्रॅंडला यापूर्वी नागपूर, औरंगाबाद, पुण्यातील खवैय्यांनी पसंती दिली आहे. त्यामुळे पिंपरीतील खवैय्यांसाठी नेहरुनगर- झिरो बॉईज चौकात मैत्री केटरर्स ही सेवा आजपासून सुरु करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.