Pimpri : बस प्रवासात महिलेची दीड लाखाची पाटली पळवली

एमपीसी न्यूज – फुगेवाडी ते पिंपरी असा पीएमपी बसमधून (Pimpri) प्रवास करत असताना अनोळखी दोघांनी महिलेच्या हातातील दीड लाख रुपये किमतीची पाटली चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 10) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.

याप्रकरणी 67 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक अनोळखी महिला आणि पुरुष यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sangvi : प्रीपेड टास्कच्या बहाण्याने फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास फुगेवाडी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी या मार्गावरून पीएमपी बसने जात होत्या. बस प्रवासात दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हातातील एक लाख 48 हजार रुपये किमतीची सोन्याची पाटली नकळत चोरून नेली. त्यांचा बसमधील एक पुरुष (Pimpri) आणि महिलेवर संशय असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.