Talegaon : तळे परिसरात देशी प्रजातीच्या 105 वृक्षांची लागवड

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन येथील तळे परिसरात तळेगाव दाभाडे नगरपरिषद व महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी कान्हे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 13) वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत 105 देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

Pune : गणेशोत्सवात तीन दिवस मद्यविक्री बंद

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या वतीने कंपनीचे प्रशासकीय व्यवस्थापक शिवाजी झनझणे आणि त्यांचे सहकारी, श्री विद्याभूषण, उपमुख्याधिकारी ममता राठोड, महिला व बालकल्याण विभाग प्रमुख सुवर्णा काळे, मिळकत विभाग प्रमुख जयंत मदने, विशाल मिंड, प्रवीण माने, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य निलेश गराडे आदी उपस्थित होते.

तळेगाव स्टेशन परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. वृक्षांची संख्या वाढल्यास जमिनीची धूप कमी होईल, तसेच पर्जन्यमान वाढेल. त्यात देशी प्रजातीचे वृक्ष असतील तर त्यांचे अधिक महत्व आहे. त्यामुळे या वृक्षांची निवड करून त्यांची लागवड करण्यात आली.

मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागामार्फत सिद्धेश्वर महाजन, रणजीत सूर्यवंशी, आकाश निंबळे यांच्या वतीने या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. शिवाजी झनझने यांनी वृक्ष लागवड व संगोपन काळाची गरज असल्याचे सांगितले. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या पंक्तींचा उच्चार करत त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.