Pimpri : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये भव्य आजी-आजोबा मेळावा

एमपीसी न्यूज – जागतिक ‘आजी-आजोबा दिना’च्या निमित्ताने (Pimpri) ‘न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी आणि शिक्षक यांनी फुलांची उधळण करत यांचे स्वागत करून आजी- आजोबांचे औक्षण केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक  अरुण चाबुकस्वार शाळेच्या मुख्याध्यापिका नाझनीन शेख, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Talegaon : तळे परिसरात देशी प्रजातीच्या 105 वृक्षांची लागवड

आजी-आजोबाच्या मनोरंजन करण्यासाठी संगीत खुर्ची कार्यक्रम ठेवला होता तसेच इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आणि सातवी या मुलांनी नृत्य सादर केले तसेच एल के जीचा विद्यार्थी देबाशी हलदार, युकेजीचा विद्यार्थी स्वरा घाटके यांनी आजी -आजोबांची बद्धल भाषण केले आजी-आजोबांनी आपल्या नातवाच्या नात्याला उजाळा दिला अथर्वशीर्षपठण केले.

विद्याथ्र्यांनी आजी-आजोबांसह गणपती बनवण्याच्या कार्यशाळेत सहभागही घेतला. शिक्षकांनी खास आजी-आजोबा आणि मुलांसाठी हास्य क्लबचे आयोजन केले होते. सर्व आजी आजोबांना चहापानाचा आणि बिस्किटाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. शंभर आजी-आजोबांनी यानी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली पाटील यांनी केले व आभार श्वेता भालेराव- गायकवाड यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.