Chinchwad : न घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची मागणी करत महिलेची बदनामी

एमपीसी न्यूज – कधीही न घेतलेले कर्ज फेडण्याची मागणी करत अज्ञातांनी महिलेचे अश्लील फोटो बनवून ते तिच्या संपर्कातील लोकांना पाठवून तिची बदनामी केली. ही घटना 22 जुलै ते 12 सप्टेंबर या कालावधीत चिंचवडगाव येथे घडली.

Pimpri : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये भव्य आजी-आजोबा मेळावा

याप्रकरणी पिडीत महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 79969544396, 8801617610382, 8801939830489, 8801708787713 क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फोन करत तसेच मेसेज करत फिर्यादीने कधीही न घेतलेले कर्ज फेडण्याची धमकी दिली. फिर्यादी यांच्या चेहऱ्याचा फोटोचा वापर करून आरोपींनी अश्लील फोटो बनवले. ते फोटो फिर्यादी यांच्या संपर्कातील लोकांना पाठवून फिर्यादीची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.