Pune : खराब हवामानाचा सलग तिसऱ्या दिवशी पुण्यातील विमानसेवेला फटका

एमपीसी न्यूज – उत्तरेत असलेल्या खराब हवामानाचा सलग तिसऱ्या दिवशी ( Pune ) पुण्यातील विमानसेवेला फटका बसला आहे. पुण्यात येणारी आणि जाणारी अशी 12 विमाने मंगळवारी (दि.16) रद्द करण्यात आली.

रद्द करण्यात आलेल्या विमानांमध्ये प्रामुख्याने दिल्लीला जाणाऱ्या आणि दिल्लीवरून येणाऱ्या विमानांचा समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात येणारी आणि जाणारी अशी 50 विमाने रद्द झाली आहेत. तर अनेक विमानांना उशीर झाला आहे. यामध्ये मंगळवारी पुण्यात येणारी सात आणि पुण्यातून जाणारी पाच अशा बारा विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली.

Talegaon Dabhade : एकदिवसीय संस्कृत संमेलन थाटामाटात संपन्न

त्यामध्ये दिल्लीच्या सहा विमानांचा समावेश आहे, तर चंडीगड, गुवाहाटी, गोवा या शहरातील विमानांची उड्डाणे रद्द झाली. त्यामुळे या शहरांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. विमाने रद्द होण्याबरोबरच अनेक विमानांना उशीर देखील झाला. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळत थांबावे लागले.

पुढील पाच दिवस धुक्याचे दिल्लीसह आजूबाजूच्या परिसरात थंडीची तीव्रता वाढणार असून, पुढील पाच दिवस धुके कायम राहणार असल्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात उत्तरेतील अनेक शहरांमध्ये विमानसेवेला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी आधी त्यांच्या विमानाचे ताजे वेळापत्रक तपासून प्रवासाला निघावे, अशी सूचना विमानतळ प्राधिकरणाने केली ( Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.