Pune : महिला व बालकल्याण आयुक्तपदी डॉ. प्रशांत नारनवरे रूजू

एमपीसी न्यूज – भारतीय प्रशासन सेवेतील सन 2009 च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रे (Pune ) स्वीकारली.

Pimpri : समान नागरी कायद्यासाठी प्रबोधन आवश्यक – ॲड. नंदू फडके

बालविकास उपायुक्त राहुल मोरे आणि प्रशासन उपायुक्त वर्षा पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. नारनवरे यांचे स्वागत केले. यावेळी सहाय्यक आयुक्त योगेश जवादे, उपसंचालक सुचिता साकोरे, सहाय्यक आयुक्त मनीषा बिरारीस, सहाय्यक आयुक्त ममता शिंदे, परीविक्षाधीन अधीक्षक दत्तात्रय मुंडे, रचना व कार्यपद्धती अधिकारी गोविंद इसानकर, सांख्यिकी अधिकारी प्रमोद निकाळजे, झुंबर जाधव, अश्विनी कांबळे आदी उपस्थित होते.

डॉ. नारनवरे यांनी यापूर्वी सांगली येथील जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी, उस्मानाबाद व पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि समाज कल्याण आयुक्त यासारखी अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. समाज कल्याण आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण काम करुन प्रशासनात  आपल्या उत्कृष्ट दर्जाच्या कामाचा ठसा उमटवला (Pune ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.