Pune : गणरायाच्या आगमनाला लागणार पावसाची हजेरी, राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे

एमपीसी न्यूज – सध्या गौरी आणि गणपतीच्या तयारीची लगबग सुरु ( Pune) आहे. त्या बरोबरीला वरूण राजा देखील यंदा गणरायाच्या आगमनाला  हजेरी लावणार असल्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने पुढील तीन राज्यभरात संततधार पाऊस राहील असा अंदाज वर्तवला आहे.

Maharashtra : महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट- क संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर

बंगालच्या खाडीत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र ओडिशाच्या दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे विदर्भात मागील 24 तासांत हलक्या पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आजपासून (शुक्रवार)  पावसाचे पुनरागमन होणार असून, पुढील तीन दिवस म्हणजे 18 सप्टेंबपर्यंत संततधार राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र ओडिशाच्या दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे शुक्रवारी गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया  या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासह ठाणे, नाशिक, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर हे जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अ‍लर्ट  ( Pune)  देण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.