Pune : मागच्या दरवाजाने कमी रूंदीच्या रस्त्यावर नऊ मीटरच्या रस्त्याचा फायदा देण्याच्या उद्देशाने हे परिपत्रक काढले नाही ना; माजी नगरसेवकांनी उपस्थित केली शंका

एमपीसी न्यूज – मागच्या दरवाजाने कमी रूंदीच्या रस्त्यावर नऊ ( Pune )मीटरच्या रस्त्याचा फायदा देण्याच्या उद्देशाने हे परिपत्रक काढले नाही ना, अशी शंका येत असल्याचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी म्हटले आहे. प्रधान सचिव नगर विकास 2 असीम गुप्ता यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत आपण तात्पुरती स्थगिती देऊन राज्य सरकारने यासंदर्भातले स्पष्टीकरण पुणे  मनपाकडे मागावावे युडीसीपीआर मधील कुठल्याही शंकेबाबत संधीग्धतेबाबत स्पष्टीकरण आणि निर्देश देण्याचा अधिकार हा फक्त राज्य सरकारचा आहे. आपण काढलेल्या कार्यालयीन परिपत्रकानुसार कुठलेही/कुठलाही रस्ता हा कायदेशीररित्या “विकास योजनेमध्ये” अंतर्भूत असलेला, कलम 205 खाली आखलेला, अथवा कलम 210 एक अन्वये अंतिम रेषा प्रमाणित केलेला असा असतो, या व्यतिरिक्त रस्त्याची व्याख्या एमआरटीपी ॲक्ट आणि एमएमसी ॲक्ट यांना मान्य नाही.
आपल्या कार्यालयीन परिपत्रकामध्ये उल्लेख केलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन पर नियमावली 2020 नुसार वर उल्लेख केलेल्या तरतुदी आहेत. या तरतुदीच्या व्यतिरिक्त कुठलीही तरतूद वापरण्याचा अधिकार युडीसीपीआर नंतर नियोजन प्राधिकरणाला नाही, हे खेदाने नमूद करावेसे वाटते. या विरुद्ध हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे.

म्हणजे यातील नेमक्या कुठल्या कलमाच्या अंतर्गत हि हार्डशीप आकारणे येते/नमूद केले आहे याचा उल्लेख नाही. कृपया त्याचा उल्लेख करावा. हार्डशिप आकारण्याचे अधिकार आयुक्तांना असले तरी नऊ मीटर नसलेल्या रस्ता नऊ मीटर गृहीत धरून त्यासाठी टीडीआर खर्ची टाकण्याचा प्रस्ताव हा संपूर्णपणे कायद्याला मान्य नसलेला आहे, असेही या नगरसेवकांनी आज दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. संचालक नगर रचना महाराष्ट्र यांनाही यासंदर्भातील निवेदन देण्यात आले ( Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.