Alandi : क्रांतिकारक राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त आळंदीमध्ये रॅली व एकपात्री नाटक

एमपीसी न्यूज – क्रांतिकारक राजगुरू यांच्या जयंती निमित्त दि.24 रोजी आज आळंदी (Alandi ) शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच इंद्रायणी काठी हुतात्मा राजगुरू यांच्या जीवनावर एकपात्री नाटक प्रा.रविंद्र चौधरी यांनी सादर केले. त्यानंतर राज्यगीत व पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

Pune : विद्या जयंत भोकरे यांचे अल्पश्या आजाराने निधन

यावेळी आळंदी ग्रामस्थ, श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थी व पत्रकार बांधव उपस्थित होते.

क्रांतिकारक म्हटलं की, सुरुवातीच्या काही नावात येणार नाव म्हणजे शिवराम हरी राजगुरू. 23 मार्च 1931 रोजी देशासाठी फासावर जाणाऱ्या शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव आणि शहीद राजगुरू यांच्या आठवणीत संपूर्ण देश 23 मार्चला ‘शहीद दिवस’ म्हणून ओळखतो. शहीद राजगुरू यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 साली महाराष्ट्रातील खेड, जिल्हा पुणे येथे झाला.

त्यांचे पूर्णनाव शिवराम हरी राजगुरू असे होते. लहानपणापासून क्रांतिकारी विचारांनी प्रभावित असलेले राजगुरू संस्कृत शिकण्यासाठी वाराणसी येथे गेले. येथेच चंद्रशेखर आझाद यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव राजगुरूंवर पडला. आणि क्रांतिकारकांच्या सहवासात आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.