Sangvi : मोबाईल टॉवरच्या साहित्याची चोरी करणाऱ्या एकाला अटक

एमपीसी न्यूज  – जुनी सांगवी परिसरात येथील मोबाईल (Sangvi) टॉवरच्या साहित्याची चोरी करणाऱ्या एका चोराला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. हि चोरी शनिवारी (दि.15) रात्री उशीरा जुनी सांगवी येथील जयमालानगर येथे घडली आहे.

याप्रकऱणी संजय चंद्रभुषण पाठक (वय 44 रा. दिघी) यांनी फिर्याद दिली असून पांडूरंग गंगाराम चौघुले (वय 32 रा.माढा, सोलापूर) याला अटक करून त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.

 Chakan News : राजगुरुनगर दुर्घटनेतील मृत  कामगारांच्या कुटुंबीयांना 10 लाखाचे अर्थसहाय्य द्या – काशिनाथ नखाते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  जयमालानगर येथे असलेल्या वोडाफोन-आयडिया कंपनीच्या टॉवरवरील 20 हजार रुपयांचे रेक्टी फायर आणि दुसऱ्या टॉवरवरचे 60 हजार रुपयांचे 3 आर.आर.यु नग असा एकूण 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. पोलिसांनी त्यातील एकाल अटक केली असून सांगवी पोलीस दुसऱ्या चोराचाही शोध घेत (Sangvi) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.