Sanskar Diwali : गडचिरोली येथील आदिवासींसोबत संस्कारची दिवाळी

एमपीसी न्यूज : संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गडचिरोली येथील जिमलगट्टा, अहेरी, भामरागड या परिसरातील आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने कपडे, साड्या, साखर, रवा, मैदा, तेल, साबण, आकाश कंदिल उटणे इ साहित्याचे वाटप आदिवासी बांधवांना केले जाणार आहे. (Sanskar Diwali) यावर्षी चिंचवड येथून शनिवार, 15 ऑक्टोबर  रोजी सायंकाळी 5 वा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांनी बसची पुजा करुन बसला हिरवा झेंडा दाखवून सर्वांना शुभेच्छा दिल्या. 

संस्थेच्या वतीने सोमवार ऑक्टोबर 17 रोजी आनंदवन सोबत दिवाळी साजरी केली जाणार आहे. मंगळवार, ऑक्टोबर 18 रोजी हेमलकसा सोबत दिवाळी साजरी करणार आणि बुधवार, 19 ऑक्टोबर रोजी दिवसभर जिमलगट्टा येथील आदिवासींसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.(Sanskar Diwali) 3000 आदिवासी बांधवांना वरील साहित्य वाटप करणार आहे. 15 साड्या, 1000 पुरुष ड्रेस,500 लहान मुलांची कपडे वाटप करणार आहे. तसेच साखर रवा, मैदा, बिस्किट पुडे, लाडु, चिवडा, तेल, उटणे, साबण, बेसन पीठ, तुरडाळ, गुळ, आकाश कंदिल अशा विविधा वस्तुंचे वाटप करणार आहे.

Girl abuse : अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सागर कवडे  आणि जिमलगट्टाचे  विभागीय पोलीस अधिकारी  सुजितकुमार क्षिरसागर यांनी सहकार्य केले.(Sanskar Diwali) संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी व सदस्यांनी संयोजन केले. या उपक्रमाची तयारी एक महिना अगोदर चालु केली होती. फक्त फेसबुक आणि व्हाट्सअँप च्या माध्यमातून ह्या वस्तू जमा झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.