Girl abuse : अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

एमीपीसी न्यूज मुलगी अल्पवयीन आहे हे माहिती असताना देखील तिला प्रेमाचे आमिष  दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.(Girl abuse) हा प्रकार 24 डिसेंबर 2021 ते 22 ऑगस्ट 2022 या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी पोलिसांनीच फिर्याद दिली असून आदित्य राजेंद्र बोऱ्हाडे (वय 20 रा.आंबेगाव) असे अटक आरोपीचे नाव असून तो आधीच सांगवी पोलिसांकडे एक वेगळ्या गुन्ह्यात सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Beauty contest : पिंपरी-चिंचवडमध्ये सौंदर्यसम्राज्ञी सौंदर्यस्पर्धा संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे मिहीत असतानाही तिला आरोपीने प्रेमाचे आमिष दाखवले, तसेच तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. त्यातून पीडितेने गर्भधारणा केली. 22 ऑगस्ट रोजी तिने घरीच प्रसुतीकरत एका बाळाला जन्म दिला.(Girl abuse) यावरून सांगवी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगवी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.