Sahityakar Sanmelan : साहित्यकार संमेलनसाठी ज्ञानेश्वर विद्यालयातील अल्लाबक्ष मुलाणी, गणेश लिखे यांची निवड

एमपीसी न्यूज : अखिल भारतीय हिंदी अध्यापक सभा, भारत सरकार व नेपाल सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने काठमांडू (नेपाळ) येथे 1नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या हिंदी शिक्षक एवं साहित्यकार संमेलन 2022 च्या राज्य समन्वयक पदी श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज आळंदी (देवाची) येथील हिंदी अध्यापक अल्लाबक्ष मुलाणी व गणेश लिखे यांची केंद्रीय समितीने निवड केली असून त्यांना ‘अंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

त्यासाठी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर,सचिव अजित वडगांवकर,खजिनदार दिपक पाटील व  या संस्थेचे सर्व विश्वस्त पदाधिकारी ,प्राचार्य,  उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व अध्यापक बंधू – भगिनींनी त्यांचे अभिनंदन केले.व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.याबाबत ची माहिती गुटे सर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.