Bhosari MIDC : एमआयडीसीतील वीज गेल्यास उद्योजकांना एसएमएस आणि कॉल सेंटरवर सुविधा निर्माण करावी- अभय भोर 

एमपीसी न्यूज : एमआयडीसीतील वीज गेल्यानंतर उद्योजकांना एसएमएस आणि कॉल सेंटरवर सुविधा निर्माण करावी या प्रश्नांसंदर्भात (Bhosari MIDC) आज फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर आणि उद्योजक यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता उदय भोसले यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात एमआयडीसीमध्ये लाईट गेल्यानंतर उद्योजकांना एसएमएस द्वारे सदर लाईट कधीपर्यंत येऊ शकेल याची माहिती मिळावी. तसेच आपली तक्रार नोंदविण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन नंबर महावितरणाने द्यावा जेणेकरून उद्योजकांना लाईट संदर्भात सूचना मिळू शकतील. अनेकदा लाईट गेल्यानंतर उद्योजकांना लाईट कधी येईल याच्याबाबत अजिबात कल्पना नसते.  त्यामुळे त्यांच्या उद्योगांच्या उत्पादनात मोठा फरक पडत असून अनेक वेळा आठ-आठ तास कामगारांना बसून पगार द्यावा लागतो. जर कॉल सेंटर द्वारे एसएमएस सुविधा चालू केल्यास उद्योजकांना योग्य तपशील समजू शकेल आणि उद्योजक योग्य तो निर्णय घेऊन आपली कामे करू शकतील.

Sahityakar Sanmelan : साहित्यकार संमेलनसाठी ज्ञानेश्वर विद्यालयातील अल्लाबक्ष मुलाणी, गणेश लिखे यांची निवड

अनेकदा महावितरणाच्या वेगवेगळ्या नंबर वर फोन केल्यास नंबर व्यस्त असतात किंवा योग्य नंबर वर याची माहिती मिळू शकत नाही. याबाबत महावितरणाने त्वरित उद्योजकांना एसएमएस आणि कॉल सेंटर सुविधा निर्माण केल्यास उद्योजकांच्या समस्या सुटू शकतील. तसेच औद्योगिक परिसरासाठी स्वतंत्र पथक निर्माण करावे जेणेकरून वीज गेल्यानंतर उद्योग परिसरातील लाईटच्या समस्या त्वरित निवारण करण्यास सहज होईल.(Bhosari MIDC) बऱ्याच वेळा मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे अनेक भागातील उद्योग दुरुस्ती न झाल्यामुळे बंद पडतात आणि उद्योग क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले आहे. महावितरणचे मुख्य अभियंता भोसले यांनी यावर त्वरित तोडगा काढून उद्योजकांना सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली.

याप्रसंगी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर उपाध्यक्ष वैभव जगताप, उद्योजक थॉमस मथाई, ऋषिकेश जोशी, शाहिद पठाण, अजय बिडवे, रोनाल्ड जॉर्ज, अतुल खैरनार, शिवाजी पाटील, प्रशांत पठारे, संभाजी लोखंडे इत्यादी उद्योजक उपस्थित होते. अनेक उद्योजक सभासद उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.