Chinchwad : नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात माजी विद्यार्थी आणि यूजीसी नॅक पीअर टीमचा परिसंवाद

एमपीसी न्यूज – विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) स्वायत्त संस्था असलेल्या राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती (Chinchwad)परिषदेच्या (NAAC) वतीने उच्च शिक्षणाच्या संस्थेचे मूल्यांकन करण्यासाठी विद्यापीठ परिषदेने नियुक्त केलेल्या तज्ञांच्या टीमने 24, 25 ऑगस्र रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी या टीमने माजी विद्यार्थी आणि पालकांशी परिसंवाद साधला.

Chinchwad : नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात माजी विद्यार्थी आणि यूजीसी नॅक पीअर टीमचा परिसंवाद

नॅक पीअर टीमच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक विधी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. पी ईश्वरा, त्यांच्यासोबत पंजाब केंद्रीय विद्यापीठाचे स्कूल ऑफ लीगल स्टडीज विभागाचे प्रमुख प्रा. तरुण अरोरा, बनारस हिंदू विद्यापीठाचे कायदा विभागाचे प्राचार्य धर्मेंद्र कुमार मिश्रा हे होते. यावेळी कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष. अॅड अशोक पलांडे, मुख्याध्यापिका प्रा. डॉ. सुनीता आढाव, प्रा. डॉ. प्रिया चोपडे, माजी विध्यार्थी विभागाच्या प्रभारी प्रा. डॉ. गंगा रेशमी तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते.

महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि पालकांसोबत या टीमने परिसंवाद केला. विद्यार्थी महाविद्यालयातून शिक्षण घेऊन गेल्यानंतर प्रत्यक्ष वकिली क्षेत्रात काम करतात. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांकडे इंटर्नशीप प्रोग्रॅम,विधी महाविद्यालयात असलेले अत्याधुनिक ग्रंथालय याबाबत टीमने विद्यार्थी आणि पालकांच्या भावना जाणून घेतल्या.

माजी विद्यार्थी वकील संघटना, बार असोसिएशनच्या माध्यमातून काम करतात. काहीजण राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षा (JMFC) उत्तीर्ण होऊन न्यायाधीश झाल्यानंतर महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात

बार असोसिएशन व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून राष्ट्रीय लोक अदालतमध्ये विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून तसेच कायद्याच्या विविध विषयांवर विद्यार्थी पथनाट्य आदीच्या माध्यमातून व मोफत कायदेविषयक सल्ला देऊन सर्व सामान्य लोकांमध्ये कायदेविषयक जागरूकता करतात.

तसेच विद्यार्थी दशेत शिकत असताना महाविद्यालयात असलेले स्वतंत्र मुट कोर्ट सोसायटीच्या माध्यमातून अभिरुप न्यायालय स्पर्धेत जज म्हणून माजी विद्यार्थी कॉलेजमध्ये येत असतात. या परिसंवादामध्ये प्रॅक्टिस करत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक धोरण तसेच समाजात प्रत्यक्षात काम करताना येणारे अनुभव लक्षात घेता विधी अभ्यासक्रमात बदल करण्याची गरज असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. पालकांनी देखील चर्चेत सहभाग घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.