Chinchwad : काळ, वेळेनुसार बदल केला नाही तर, मागे रहाल – गणेश शिंदे

एमपीसी न्यूज – चिंचवड (Chinchwad) येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात इ.11 वी. च्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ पालकांसमवेत प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

Pune : ऑटोरिक्षा व तीनचाकीसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथील समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त वि

संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका व उपप्राचार्या डॉ. वनिता कुर्‍हाडे, एम.बी.ए.चे संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. तृप्ती बजाज, प्रा. वर्षा निगडे उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रात सुवर्ण व रजत पदक प्राप्त केलेल्या सिद्धी शिर्के (सायकलिंग), गारगी मोरे, अंजली सपाटे (कुडो), वैष्णवी मारणे (योगा) यांना व आदींना स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. सुमारे 90 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित विविध राज्याचे पारंपारिक वेशभुषा परिधान करून विलोभनिय पारंपारिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकत राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली. त्याला उपस्थित पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

व्याख्याते गणेश शिंदे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, “आई वडिलांची अपेक्षा प्रत्येक पाल्याकडून असते ती पूर्ण करण्यासाठी व सद्यःपरिस्थिती बदलण्यासाठी ज्ञान व शिक्षणाला पर्याय नाही” हेच दिवस ध्येयावर लक्ष केंद्रीत करीत मोठी स्वप्न व यश संपादन करण्यासाठी आहे. या काळात चुकीच्या मित्रांची संगत मिळाली तर, पाय घसरतील.

आई-वडिलांचे स्वप्न व त्याची मान शरमेने खाली जाईल, असे कृत्य करू नका. नको त्या गोष्टीच्या मागे काहींनी नैराश्यातून आत्महत्याही केल्या आहेत. मोबाईलचा वापर किती करायचा हे तुमचे तुम्हीच ठरावा. वाईट मार्गाची प्रवृत्ती टाळत शिक्षण घेत जीवनाचा आनंद उपभोगा जिद्द, चिकाटीच्या जोरावर शिक्षणावर भर द्या, लक्षात ठेवा. आपले व्यवहार नीट ठेवत संवेदनशीलता बाळगून माणूस म्हणून जगा.

आहार, व्यायामावर भर देत भावीकाळात उदरनिर्वाह हे जीवनाचे ध्येय न बाळगता मर्यादित क्षेत्रात मर्यादित काम न करता अमर्यादित काम करून स्वतःची वेगळी आगळी ओळख निर्माण करा. काळ व वेळेवर बदलणारे तंत्रज्ञान आत्मसात करूनच बदलावे लागणार आहे. चौकटीच्या पलीकडे जावून कामे करा. पदवी घेवून पॅकेजच्या मागे जावू नका हे लक्षात ठेवा. यासाठी बदलाची सुरूवात आपल्या पासूनच करण्याचे आवाहन केले.

संजय नाईकडे म्हणाले, ‘17 ते 25 हे वय प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचे असते. ध्येयाने वेडे व्हा, पालकांनीही आपले विचार लादू नये’ आजची तरूण पिढी विविध आजाराने ग्रस्त आहे, हे पाहणीत आढळून आले आहे. यासाठी व्यायाम करून मन, शरीर स्वच्छ ठेवा, शारिरीक व मानसिक दृष्ट्या भक्कम रहा व आई वडिलांच्या अपेक्षापूर्ती कृती रूपी साकारा, लोक तुमचे नाव कौतुकाने घेतील असे अशी कार्यशैली आत्मसात करावी.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिव डॉ. दिपक शहा आपल्या मनोगतात म्हणाले, कष्ट करायला लाजू नका. आपली स्वप्ने जी आहेत ती कृतीरूपी पूर्ण करा. रुळलेली वाट सोडून काहीतरी वेगळं करून दाखविण्याची जिद्द उराशी बाळगून आयुष्यात जे करायच आहे ते उत्कृष्ट कसे करता येईल, याचाच ध्यास अंगिकारा शिक्षण घेताना शिक्षकांची प्रत्येक गोष्ट, सुचनांचे पालन करीत शिक्षण आत्मसात करून उंच भरारी घ्यावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. वनिता कुर्‍हाडे म्हणाल्या, पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संस्थाचालक व शिक्षक सातत्याने प्रयत्नशिल असतात. सामुहिक प्रयत्नामुळेच महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला व सुप्त कलागुणांचा सर्वांगीण कृतीरूपी विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रविंद्र निरगुडे यांनी केले तर आभार, प्रा. तृप्ती बजाज यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम घेतले.

https://youtu.be/a5tsOUp4Dkc?si=i8r_7vlprjYtvabu

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.