Talegaon : श्री दुर्गामाता महिला नागरी सहकारी पतसंस्थेची 30 वी वार्षिक सर्वाधारण सभा उत्साहात पार

एमपीसी न्यूज – श्री दुर्गामाता महिला नागरी सह. पतसंस्थेची 30 वी वार्षिक सर्व साधारण सभा 13 सप्टेंबर रोज उत्साहात पार पडली.

Pimpri : पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ ही भूमिका मांडली – उल्हास जगताप

या सभेचे आयोजन तळेगाव (Talegaon) येथील रिक्रिएशन हॉल, येथे करण्यात आले होते. संस्थेच्या उपाध्यक्षा रूपाली लोमटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, वार्षिक सभेच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. संचालिका शुभांगी देशपांडे व नीता साळवे यांनी सुत्रसंचालन केले. खजिनदार शुभांगी बुरूड यांनी सर्व हिशेबपत्रके सादर केली. सेक्रेटरी सुजाता खेर यांनी मागील वार्षिक अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमास उपस्थित संचालिका निलम कुलकर्णी, निलम खांडगे, कल्पना भोपळे, जयश्री शिंदे, . संध्या देखणे व आशा शिर्के यांनी, संस्थेच्या सर्व दैनंदिन बचत प्रतिनिधी व कर्मचारी वृंद यांचा सत्कार केला.

श्री दुर्गामाता महिला नागरी सह. पतसंस्था ही मावळातील पहिली महिला पतसंस्था असुन गरजु महिला, भाजी विक्रेते, किरकोळ दुकानदार यांना कर्जवाटप करून त्यांच्या संसाराला हातभार लावत आहे. जामिनकी कर्ज 75 हजार- ( व्याजदर 15%) व तारणी कर्ज मर्यादा .15 लाख पर्यंत (व्याजदर 13%) आहे. संस्थेचे अधिकृत भाग भांडवल 1 कोटी असुन वसुल भाग भांडवल 73 लाख इतके आहे.

अहवाल सालात संस्थेला 11 लाख 9 हजार 912 इतका नफा झाला असुन यावर्षी 8% लाभांश जाहीर केला आहे. संस्थेच्या वतीने शारदा मोहन ताम्हाणे व मिना अनिल अमराळे यांना 2023- 24 चा ‘आदर्श माता’ पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बोर्ड चे प्रशिक्षण अधिकारी नेवसे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. सभासदांची कर्तव्ये व जबाबदा-या काय आहेत याची माहिती दिली.

व्यवस्थापक. सुधा जोशी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. संस्थेच्या सभासद मिनाक्षी वाघ यांनी गायलेल्या पसायदानाने सभेची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व संचालक, कर्मचारी व सर्व बचत प्रतिनिधींनी सहकार्य केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.