Pimpri : पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ ही भूमिका मांडली – उल्हास जगताप

एमपीसी न्यूज – पंडित दिनदयाळ उपाध्याय (Pimpri) हे थोर विचारवंत आणि चिंतक होते. एकात्म मानववाद भारतात रुजविणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. देश विकासाच्या अनेक कामांसाठी त्यांनी सकारात्मक प्रयत्न केले. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही भूमिका दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडली. तसेच समाजाचे अर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांनी युवकांसाठी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

Chakan : कारच्या धडकेत दोन लहान मुलांसह चौघे जखमी

या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे (Pimpri) मनोज माछरे, नितीन समगीर, दिगंबर चिंचवडे, शेखर गावडे, चंद्रकांत भोईर, विशाल भुजबळ तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.