Chakan : कारच्या धडकेत दोन लहान मुलांसह चौघे जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव कारने एका दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील दोन लहान मुले आणि दोन महिला रस्त्यावर पडले. या अपघातात दोन लहान मुलांसह चौघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि. 24) दुपारी पावणे एक वाजता पुणे-नाशिक महामार्गावर वाकी बुद्रुक येथे घडला.

Pimpri Chinchwad : अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांचे सेवानिलंबन करा; एमआयएमची मागणी

याप्रकरणी जखमी 28 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार (एमएच 14/जेयु 2050) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या जाऊ आणि दोन लहान मुलांसोबत दुचाकीवरून खेड येथील वक्रतुंड हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात होत्या. त्या वाकी बुद्रुक येथील वीटभट्टीसमोर आल्या असता त्यांच्या पाठीमागून भरधाव आलेल्या कारने फिर्यादी चालवत असलेल्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये फिर्यादी, त्यांची जाऊ आणि दोन लहान मुले रस्त्यावर पडले. त्यात चौघेही गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर कारचालक घटनेची माहिती न देता, जखमींना उपचारासाठी दाखल न करता घटनास्थळावरून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण (Chakan) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.