Chakan : रासे गावात दारू भट्टीवर चाकण पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील रासे गावात चाकण पोलिसांनी ( Chakan ) दारू भट्टीवर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी 40 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 24) रात्री करण्यात आली.

Talegaon : श्री राम गीताने रसीक मंत्रमुग्ध, संगीत साधना मंडळातर्फे स्पर्धेचे आयोजन

याप्रकरणी पोलीस अंमलदार पवन आहेरकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने रासे गावात डोंगरा जवळ गावठी दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाईमध्ये 40 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे. चाकण पोलीस तपास करीत ( Chakan ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.