Pune : पुण्यात होणार कथक गुरू पंडिता रोहिणी भाटे ह्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भव्य नृत्य महोत्सव

एमपीसी न्यूज : पुणे शहर हे (Pune) भूमी मानलं जातं. इथे गल्लोगल्ली नृत्यवर्ग चालतात व इथल्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाला इथल्या जाणकार प्रेक्षकवर्गाचा पाठिंबा असतो. अशा पुणे शहराचे भूषण असलेल्या कथक नृत्य गुरू पंडिता रोहिणी भाटे ह्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नृत्य महोत्सव आयोजित केला जाणार आहे.

चंद्रकांत पाटील ह्यांच्या प्रोत्साहनाने व पूनित जोशी आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थाचे कार्यकर्ते ह्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा नृत्य महोत्सव साजरा होणार आहे.
ह्या पुण्यात होणाऱ्या गुरू पंडिता रोहिणी भाटे महोत्सवाचे हे पहिले वर्ष आहे. आणि तो पुढच्या प्रत्येक वर्षी पुढे चालू ठेवायचा आहे. ह्याच निमित्ताने सर्व नृत्य विद्यार्थिनी, मित्रपरिवार, नातेवाईक या सर्वांना आग्रहाचे आमंत्रण आहे.

Talegaon : श्री राम गीताने रसीक मंत्रमुग्ध, संगीत साधना मंडळातर्फे स्पर्धेचे आयोजन

ह्या नृत्य महोत्सवाची मूळ संकल्पना कथक गुरू विदुषी शमा भाटे ह्यांची असून अनेक वर्षांच्या पाठपुराव्याने ती आज फळाला येत आहे. ह्या महोत्सवाला शमा ताईंच्या बरोबरीने ज्येष्ठ नृत्यांगना आणि गुरू डॉ. सुचेता चापेकर आणि गुरू मनीषा साठे ह्यांचे ही बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. ह्या कार्यक्रमाचे संयोजन अजय धोंगडे यांचे आहे.

हा महोत्सव येत्या शनिवारी, 27 जानेवारीला, शुभारंभ लॉन्स, D.P. रोड, पुणे येथे, संध्याकाळी 5.45 वाजता होणार आहे.

ह्या कार्यक्रमात रोहिणी ताईंना आदरांजली म्हणून त्यांची संस्था नृत्यभारतीच्या 20 नृत्यांगना रोहिणी ताईंची संरचना असलेली प्रस्तुती सादर करतील. तसेच शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या सभासद असलेल्या (Pune) कथक व भरतनाट्यम नृत्यांगना त्यांची अर्घ्यम ही नृत्यप्रस्तुती सादर करतील. ह्याची संरचना शमा भाटे ह्यांची आहे. पुण्याबाहेरून विशेष आमंत्रित जगविख्यात कलाकारांमध्ये गुरू रमा वैद्यनाथन आणि ग्रुप (भरतनाट्यम), गुरू वास्वती मिश्रा(कथक) आणि ग्रुप आणि गुरू प्रीती पटेल आणि ग्रुप (मणिपुरी) ह्या नृत्यप्रस्तुती सादर करतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.