Talegaon : श्री राम गीताने रसिक मंत्रमुग्ध, संगीत साधना मंडळातर्फे स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज – श्री राम गीतांनी उपस्थित रसिक (Talegaon ) मंत्रमुग्ध झाले होते. निमित्त होते संगीत  साधना मंडळाच्या श्री राम गीतांच्या स्पर्धेचे. यावेळी सहभागी स्पर्धकांनी गायलेल्या गितांनी रसिक हरखून गेले होते.

तळेगाव दाभाडे येथे 21 जानेवारी रोजी श्री विठ्ठल मंदिरात निळकंठ नगर येथे स्पर्धा संपन्न झाल्या. कै. शरदराव शंकर शेवडे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

PCMC : प्रजासत्ताक दिनानिमित्त निगडीत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

या स्पर्धेसाठी 35 स्पर्धकांनी सहभाग घेतला परीक्षक म्हणून सुधीर राणे व श्रीराम वैद्य यांनी काम पाहिले .

विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे – प्रथम क्रमांक प्रकाश देशमाने, द्वितीय क्रमांक सुजाता कुलकर्णी, तृतीय क्रमांक अंजली जानकर यांनी (Talegaon ) पटकावला.

संगीत साधना मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय मेढी, कार्याध्यक्ष संजय गरुड कोषाध्यक्ष सूर्यकांत भोसले आणि सुरेखा गरुड यांच्या व परीक्षकांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला या उपक्रमाचे तळेगावातील संगीत प्रेमींनी कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.