SVB Bank News : सिलिकॉन व्हॅली बँक बुडाली

बँकेची मालमत्ता जप्त

एमपीसी न्यूज – अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक  (SVB Bank News) बुडाली आहे. कॅलिफोर्नियाच्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशनने बँक बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. बँक  बुडाल्यानंतर  बँकेची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

सिलिकॉन व्हॅली बँक ही अमेरिकेतील 16 वी सर्वात मोठी बँक आहे. त्याची एकूण मालमत्ता 209 अब्ज डॉलर आणि 175.4 अब्ज डॉलरच्या ठेवी आहेत. ही बँक नवीन भांडवल कंपन्यांसाठी मोठा आधार होती. तंत्रज्ञान उद्योगात बँकेचा मोठा वाटा होता.

 

Pune News : आज मिरज-कोल्हापूर दरम्यानच्या रेल्वे गाड्या रद्द

 

भारताच्या तंत्रज्ञानावर आधारित नवीन स्टार्टअपसना आता याचा फटका बसू लागला आहे. सॉफ्टवेअर सेवा पुरवठा क्षेत्रातील मोठय़ा संख्येने भारतीय नवीन स्टार्टअपसची खाती एसव्हीबीमध्ये आहेत. हे स्टार्टअप प्रामुख्याने अमेरिकी ग्राहक कंपन्यांना सेवा प्रदान करतात. तंत्रज्ञानावर आधारित उद्योग हे एसव्हीबीचे सर्वात मोठे ग्राहक होते.

शुक्रवारी या बँकेची मूळ कंपनी एसव्हीबी  फायनान्शियल ग्रुपचे शेअर्स  गडगडले.मात्र त्यापूर्वी गुरुवारीच अमेरिकेतील अनेक व्हेंचर कॅपिटल फंडांनी एसव्हीबीमधील समभाग काढून घेण्याचा सल्ला दिला होता.

सिलिकॉन व्हॅली बँक  बुडाल्यामुळे तरुण उद्योजक तर अधिक अडचणीत येणार आहेतच  ,पण तंत्रज्ञान (SVB Bank News) क्षेत्रातील अनेक अतिशय श्रीमंत उद्योजकांनीही वैयक्तिक ठेवी एसव्हीबीमध्ये ठेवल्या होत्या,त्यामुळे त्यांनाही मोठा फटका बसला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.