Pune News : आज मिरज-कोल्हापूर दरम्यानच्या रेल्वे गाड्या रद्द

एमपीसी न्यूज -रेल्वेच्या पुणे विभागाकडून मिरज-कोल्हापूर (Pune News) लोहमार्गावरील हातकणंगले स्थानकावर आज (ता.14) ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

 

 

इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग बदलणे आणि इतर तांत्रिक कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मंगळवारी धावणाऱ्या मिरज-कोल्हापूर, कोल्हापूर-सातारा, मिरज-कोल्हापूर-मिरज, सांगली-मिरज, कोल्हापूर-सांगली, मिरज-कोल्हापूर या प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

 

Today’s Horoscope 14 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

पुण्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या गाडी पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस मिरजपर्यंत धावेल. ती मिरजपासून पुढे जाणार नाही. याचबरोबर 15 मार्चला धावणारी कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस मिरजहून पुण्याला सुटणार आहे, अशी माहिती (Pune News) रेल्वेने कळविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.