Today’s Horoscope 14 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 14 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

 

वार – मंगळवार.

 

14.03.2023.

 

शुभाशुभ विचार – अनिष्ट दिवस.

 

आज विशेष – कालाष्टमी.

 

राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30.

 

दिशा शूल – उत्तरेस असेल.

 

आजचे नक्षत्र- अनुराधा 08.13.

 

चंद्र राशी – वृश्चिक.

—————————————-

 

मेष – ( शुभ रंग- केशरी )

कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस तितकासा चांगला नाही. आज झटपट लाभाचा मोह टाळायलाच हवा. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत, सामान्य दिवस.

 

वृषभ (शुभ रंग- जांभळा)

व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही.  भागीदारीच्या व्यवसायात देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा. वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असेल.

 

मिथुन ( शुभ रंग- पांढरा)

नोकरीत कामे पूर्ण करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. तब्येत तुमची आज थोडी नरमच राहील. जुनी दुखणी अंगावर काढू नका. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीस प्रवेश नको.

 

कर्क (शुभ रंग- निळा.)

कार्यक्षेत्रातील तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ राहील. दुपारनंतर काही बिकट प्रश्न सहजच सोडवाल. डॉक्टरांना आज असाध्य आजारावर अचूक उपाय सापडेल.

 

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही आपल्या मतावर ठाम राहाल. स्थावराची खरेदी विक्री फायद्यातच राहील. आज तुम्ही घर सजावटीस प्राधान्य द्याल. गृहिणींचे गृह उद्योग तेजीत चालतील.

 

कन्या ( शुभ रंग- पिस्ता)

नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात. अति आत्मविश्वास ही नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. आज काही अति हुशार मंडळी संपर्कात येतील डोके शांत ठेवा.

 

तूळ ( शुभ रंग- आकाशी)

आज मोठे आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा. अनावश्यक खर्च टाळा. दिवसाच्या उत्तरार्धात एखाद्या मोठ्या खर्चाची तयारी ठेवावी लागेल. वृद्धांनी तळपायांची काळजी घ्यावी.

 

वृश्चिक (शुभ रंग- चंदेरी)

नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. बंद पडलेले उपक्रम नव्याने सुरू करता येतील. सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकाराचा गैरवापर मात्र टाळा.

 

धनु- (शुभ रंग- भगवा)

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांची पावले मनशांतीसाठी सत्संगाकडे आपोआपच वळतील.

 

मकर ( शुभ रंग- पांढरा)

नोकरीच्या ठिकाणी बढतीच्या मार्गातील अडथळे आता दूर होतील. अधिकार योग चालूनच येतील. आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मोठा भाऊ आज तुम्हाला योग्य सल्ले देईल.

 

कुंभ (शुभ रंग -गुलाबी)

आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. अधिकारी असाल तर वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येईल. रखडलेली शासकीय कामे गती घेतील.

 

मीन -(शुभ रंग – क्रीम )

कार्यक्षेत्रात डोक्यात ताप देणाऱ्या काही घटना घडणार आहेत नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ जितके विचारतील तितकेच सांगा फार खोलात शिरून तुमच्याच अडचणी वाढतील. घरातील मोठ्यांचा मान राखा.

 

शुभम भवतु.

 

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.