Talegaon Dabhade : निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

एमपीसी न्यूज – मावळभूषण, शिक्षण महर्षी, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रायणी महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेत क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी (दि. 14) पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डाॅ. संदीप पालवे यांचे हस्ते संपन्न झाला.

Pcmc Best Veg Hotel : स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलिस आणि जवानांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये खास जेवणाचा बेत

याप्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, बी व डी फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, प्रा जी एस शिंदे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीसह विद्यार्थी उपस्थित होते.

या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशी पारितोषिके देण्यात आली. प्रथम पारितोषिक 5 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 3 हजार रुपये व तृतीय पारितोषिक 2 हजार रुपये आणि उत्तेजनार्थ प्रत्येकी 500 रुपये तसेच प्रशस्तिपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले.

निबंध व वक्तृत्व स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी सांगितले.

 

स्पर्धेचा निकाल

वरिष्ठ विभाग- निबंध स्पर्धा

1  शितल गुंडेराव इटकर

2  मानसी बाळू कालेकर

3  पूनम देवलास भारद्वाज

उत्तेजनार्थ- पूजा दत्तात्रय केदारी

साक्षी नारायण शेंडगे

कनिष्ठ विभाग- निबंध स्पर्धा

1 अनुष्का गोरख जांभुळकर

2 मिथाली संजय फडतरे

3 रूबी राजेश प्रसाद

उत्तेजनार्थ- प्रणव कृष्णांत पोवार

हर्षदा मारूती जांभुळकर

वरिष्ठ विभाग- वक्तृत्व स्पर्धा

1 सौरभ चंद्रभान चेचरे

2 सिया एंजल रेगी

3 वेदिका राजेंद्र आंधळे

उत्तेजनार्थ- प्रांजली भेगडे

श्वेता बाबाजी कांबळे

 

कनिष्ठ विभाग- वक्तृत्व स्पर्धा

1 क्षितिजा राजाराम डोके

2 विशाखा महेश कांबळे

3 तेजस्विनी राजवाडे

उत्तेजनार्थ- ऋतुजा मारूती ढोरे

रसिका मनोज मोरे

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.