Talewade : तळवडे स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना 20 लाख अर्थसहाय्य द्या – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील (Talewade)तळवडेतील शिवराज इंटरप्राईजेस वाढदिवसाच्या केकवर वापरल्या जाणाऱ्या स्पार्कल कॅण्डल तयार करण्याच्या कारखान्यांमध्ये 8 डिसेंबरला झालेल्या स्फोट आणि आगीमध्ये 11 कामगारांचा मृत्यू झालेला असून यामध्ये महापालिका, पोलीस प्रशासन, कामगार विभाग अशा सर्व शासकीय यंत्रणा दोषी आहेत.

यातील संबंधित दोषीवर सदोष मनुष्यधाचा गुन्हा (Talewade)दाखल करून मृत कामगारांच्या कुटुंबियाना 20 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मागणी राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष, कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली.

याबाबत पुण्यातील सहाय्यक कामगार आयुक्त अभय गीते यांना निवेदन देण्यात आले. कर्मचारी संघटनेचे सहसचिव चंद्रकांत कुंभार ,कार्याध्यक्ष नाना कसबे, सलीम डांगे यांच्या शिष्टमंडळाने भेटून पुणे जिल्ह्यातील कामगारांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी केवळ 5 लाख रुपये जाहीर केलेले आहेत मात्र ती कमी रक्कम असून प्रत्येक कुटुंबीयांना 20 लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

नखाते यांनी मुख्यमंत्री ,कामगार उपायुक्त, पोलीस आयुक्त ,पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, औद्योगिक सुरक्षा संचालनालय यांना निवेदन देण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, ही घटना अत्यंत भयानक आहे. सर्व शासकीय यंत्रणांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही व अशा घटना वारंवार घडत आहेत.

Pune : श्रीरंग कला निकेतन संचलीत कराओके क्लबचा दुसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा

पूर्णानगर येथील हार्डवेअर दुकानात आग लागून एकाच कुटुंबातील 4 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. दळवीनगर येथील भंगार दुकानात लागलेली आग असो की आकुर्डी येथील बिना इंग्लिश स्कूल शेजारी वर्कशॉपला लागलेली आग यासह अशाअनेक छोट्या-मोठ्या उद्योगांमध्ये कारखान्यांमध्ये अनेक कामगार, श्रमिक वर्ग मृत्यू पावत आहेत.

संबंधित कारखान्याचे मालक उद्योगाची नोंदणीच करत नाहीत. कामगारांची नोंदणी करण्यात येत नाही. या कंपन्यांत फायर ऑडिट करत नाहीत. या दुर्घटनेच्या जवळच देहूरोड दारूगोळा कारखाना, कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे, याची आगेची तीव्रता वाढली असती तर पूर्ण पिंपरी-चिंचवड शहर धोक्यात आले असते. त्यामुळे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून महापालिकेला नोटीस देण्यात आली त्यावरही दुर्लक्ष झाले . अशा घटना रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांकडून योग्य ती काळजी घेण्यात यावी. तसेच मृताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 20 लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.