Jejuri : श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी येथील श्री खंडेराय मंदिरात षडरात्र उत्सवास चैतन्यमय वातावरणात प्रारंभ

एमपीसी न्यूज – श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी येथील श्री खंडेराय मंदिरात षडरात्र उत्सव (Jejuri ) चैतन्यमय वातावरणात सुरू झाला. करवीर पिठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते व व प्रमुख उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. यावेळी सर्व विश्वस्त मंडळा सोबत गावकरी, मानकरी, खांदेकरी, वारकरी, सेवेकरी, पुजारी व भाविक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

उत्सवानिमित्त देवाला घालण्यात आलेला नवीन पोशाख पगडी अत्यंत सुंदर व मोहक होती. देवाची विधिवत पूजा नंतर घटस्थापना करण्यात आली व त्यानंतर अन्नछत्र येथेअन्नपूर्णा मातेची पूर्ण पूजा करून भाविकांना मोफत महाप्रसाद उपलब्ध करून देण्यात आला.

Talewade : तळवडे स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना 20 लाख अर्थसहाय्य द्या – काशिनाथ नखाते

खंडेरायाच्या या षडरात्रींमध्ये चंपाषष्ठी पर्यंत मार्तंड विजय स्तोत्र पारायण, श्री मार्तंड याग खंडेरायाच्या विविध पूजा गडावर (Jejuri ) संपन्न होणार आहे. सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख असून मागच्या मार्गाने कोणतीही खाजगी गाडी जाणार नाही मात्र देवस्थाने अबाल, वृद्ध, दिव्यांग यांसाठी मागे वर जाण्यासाठी व दर्शनासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती विश्वस्त आणि डॉक्टर राजेंद्र खेडेकर विश्वस्त यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.