Thergaon : बांधकाम सुरू असलेली इमारत वाकली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

एमपीसी न्यूज – थेरगाव परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीचे (Thergaon) आपली जागा सोडली. त्यामुळे इमारत वाकली गेली. ही घटना मंगळवारी (दि. 13) रात्री दहा वाजता सुमारास घडली.

थेरगाव येथे सुनील दोलवानी यांची G+3 ही बांधकाम साईट सुरू आहे. इमारतीचे जवळपास सर्व काम होत आले आहे. मंगळवारी रात्री या इमारतीचे लगतच्या इमारतीपासून आपली जागा सोडली. त्यामुळे इमारत वाकली गेली. या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Today’s Horoscope 14 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

रात्री 10.17 वाजता राहुल सरोदे यांनी थेरगाव उप अग्निशमन केंद्राला याबाबत माहिती दिली. त्यानुसार पिंपरी आणि थेरगाव येथील अग्निशमन बचाव पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. दरम्यान पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले.

वाकलेली इमारत पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. इमारत पडणार अशी भीती सर्वजण व्यक्त करत होते. अग्निशमन जवानांनी पोलिसांच्या मदतीने इमारतीच्या आजूबाजूचा परिसर खाली केला  (Thergaon) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.