Thergaon : थेरगाव रूग्णालयाची जबाबदारी डॉ.  राजेंद्र फिरके यांच्याकडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव (Thergaon ) रूग्णालयाचे प्रमुख डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्याकडे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे रूग्णालयीन कामकाजाच्या दृष्टीने यमुनानगर रूग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके यांच्याकडे थेरगाव रूग्णालयाचा कारभार देण्यात आला आहे. याबाबतचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी जारी केला आहे.

Pimpri : नाट्यगृहांतील तारखांचे आरक्षण आणि  प्रस्तावित भाडेवाढीचा फेरविचार करा – भाऊसाहेब भोईर

डॉ. दादेवार यांना थेरगाव रूग्णालयातील नवीन विकसित करावयाचे विभाग व विस्ताराच्या कामकाजासह वैद्यकीय मुख्य कार्यालयातील अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदाचाही कारभार पहावा लागणार आहे. त्याचबरोबर पिंपरीतील जिजामाता रूग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद नासेर इब्राहीम अलवी यांची यमुनानगर (Thergaon ) रूग्णालयात बदली करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.