Pimpri : नाट्यगृहांतील तारखांचे आरक्षण आणि  प्रस्तावित भाडेवाढीचा फेरविचार करा – भाऊसाहेब भोईर

एमपीसी न्यूज – नाट्यगृहांच्या तारखांचे वाटप तथा आरक्षण ऑनलाईन पध्दतीने सुरू( Pimpri) झाल्यास बऱ्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तारखांचे आरक्षण आणि प्रस्तावित भाडेवाढीचा फेरविचार करण्याची मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात भोईर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने नाट्यगृहांच्या भाड्यात वाढ प्रस्तावित केली असून तारखांचे वाटप ऑनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जुलै 2023 पासून याची अंमलबजावणी सुरू होईल, असे सांगण्यात आले आहे.

नाट्यगृहांच्या तारखांचे वाटप तथा आरक्षण ऑनलाईन पध्दतीने सुरू झाल्यास बऱ्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. नाटके, बालनाट्य, गाण्यांचे कार्यक्रम, एकांकिका आदींसाठी अपेक्षित तारखा मिळणे अवघड होऊन बसेल. यात आयोजकांचे नुकसान होण्याबरोबरच रसिक प्रेक्षकांचाही हिरमोड होईल.

Chichwad : बँकेतून बोलत असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाची दिड लाखांची फसवणूक

ऑनलाईन पध्दतीने तारखांचे वाटप करू नये. नाटकात काम करणाऱ्या सर्व कलाकारांच्या तारखा जुळून आल्यानंतर नाट्यगृहात होणाऱ्या प्रयोगांच्या तारखा निश्चित केल्या जातात. इतरही अनेक गोष्टी त्या दिवशी जमवून आणाव्या लागतात. अशा वेळी नाट्यगृहाची तारीख न मिळाल्यास तथा मिळालेली तारीख हातातून गेल्यास अनेकांची गैरसोय होते आणि तो दिवस व्यर्थ ठरल्याने आर्थिक नुकसानही होण्याची भीती आहे.तसेच कलाकारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल.

नाट्यगृहांची भाडेवाढ करण्यास आमचा विरोध नाही. मात्र, ती वाढ अवाजवी असू नये. नाट्यव्यावसायिकांना, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांना परवडणारे दर असावेत. नाट्प्रयोग होण्यापूर्वी तीन महिने अगोदर भाडेदर, अनामत रक्कम आदी रक्कम भरण्याचे प्रस्तावित असून ते शक्य होणार नाही. तसे होणे कठीण आहे. या निर्णयाचा आपण फेरविचार करावा. नाट्यगृहांच्या तारखा आरक्षित करताना शनिवार आणि रविवारी येणाऱ्या तारखा प्राधान्याने नाटकांसाठी राखून ठेवाव्यात. (त्याचे कारण  या दोन दिवशीच नाटकांना समाधानकारक प्रेक्षक वर्ग लाभतो.) दिलेल्या तारखा काहीही कारण न देता काढून घेतल्या जातात. या प्रकारांना आळा बसावा. नाट्यगृहांमध्ये नियुक्त केले जाणारे अधिकारी जाणकार असावेत. किमान या क्षेत्राविषयी त्यांना पुरेशी माहिती( Pimpri) असावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.