Chichwad : बँकेतून बोलत असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाची दिड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बँकेतून बोलत असल्याचे सांगत ज्येष्ठ ( Chichwad) नागरिकाची तब्बल दिड लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 15 ते 16  मार्च 2023 या कालावधीत चिंचवडगाव येथे घडला आहे.

शिवाजी रामभाऊ काठे (वय 70 रा.चिंचवडगाव) यांनी गुरुवारी (दि.8) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून 9223011000 या अज्ञात मोबाईल धारकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pimple Gurav : ” मुळशी सत्याग्रहाचा लढा अजूनही संपलेला नाही!” – बबन मिंडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना वरील मोबाईल क्रमांकावरून आरोपीने फोन केला. बंधन बँकेतून बोलत असल्याचे सांगत त्याने एक एसएमएस फिर्यादीला पाठवला. तोच एसएमएस परत पाठवायला सांगत आरोपीने फिर्यादीच्या खात्यावरील 1 लाख 58 हजार रुपये परस्पर काढून घेतले. या आर्थिक फसवणूकीवरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत ( Chichwad) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.