Wakad : देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर धावती कार पेटली

एमपीसी न्यूज – देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर धावत्या कारने पेट घेतला. ही घटना आज, गुरुवारी (दि. 6) दुपारी बाराच्या सुमारास वाकड जवळ घडली.

गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरून जात असताना धावत्या डस्टर कारने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या रहाटणी उपविभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.