Wakad : गाडी वॉशचे पैसे मागितले म्हणून वॉशिंग सेंटर चालकाला मारहाण 

एमपीसी न्यूज- गाडी धुतल्यानंतर त्याचे पैसे मागितले म्हणून तिघांनी वॉशिंग सेंटर (Wakad) चालकाला मारहाण करत वॉशिंग सेंटरची तोडफोड केली आहे . ही घटना रविवारी(दि.30) रात्री वाकड येथील प्रतिभा हिरो शोरूम समोर घडली.

याप्रकरणी सुमित दत्तात्रय शिंदे (वय 29 रा चिंचवड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून पोलिसांनी सिद्धार्थ विठ्ठल जौंजाळ (वय 35 रा.चिंचवड) याला अटक केली असून राहुल विठ्ठल जवंजाळ( वय 38) व एक महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : पुणे नगर रस्त्यावर बीआरटी मार्गात दोन बसची समोरासमोर धडक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे व्हीआयपी वॉशिंग सेंटर नावाचे दुकान आहे. आरोपी तेथे त्यांची टू व्हीलर (Wakad ) धुण्यासाठी आले. गाडी धुवून झाल्यानंतर पैसे मागितले असता तुझ्या मालकाचा मी दाजी आहे असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादीने जागा मालक सचिन केदारी यांना बोलावून घेतले यावेळी केदारी यांनीही ते नातेवाईक असल्याचे मान्य केले.

मात्र यानंतर काही वेळाने पुन्हा राहुल व सिद्धार्थ वॉशिंग सेंटरवर आले व त्यांनी तेथे तोडफोड करत 20 हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच फिर्यादी व त्यांचा मित्र यांना धक्काबुक्की केली. यात फिर्यादीच्या मित्राची सहा तोळ्याची अडीच लाख रुपयांची  सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेत आरोपींनी त्यांना मारहाण केली .

यावेळी राहुल व सिद्धार्थ फिर्यादीला उद्या तुझा मर्डर करतो पोलिसात तक्रार दिली तर सर्वांना जीवनाशी मारून टाकेन अशी (Wakad) धमकी दिली फिर्यादीने या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार केली असून वाकड पोलीस (Wakad ) याचा तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.