Pune : लष्कराच्या दक्षिण मुख्‍यालयाअंतर्गत 30 केंद्रांमध्ये योग दिवस साजरा

एमपीसी न्यूज – योगाभ्यास सर्व घटकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचण्यासाठी  आणि योगाभ्यासाचा अवलंब करण्याच्या दृष्टीने  लष्कराच्या दक्षिण मुख्‍यालयाने 21 जून 23 रोजी दहा राज्यांमधील 30 लष्करी केंद्रांवर अय्यंगार योग समूहाच्या  माध्यमातून मिश्र पद्धतीमध्ये एक भव्य  योग सत्र आयोजित केले होते. सर्व पदस्थ  आणि त्यांच्या कुटुंबांसह 35 हजार सहभागींनी या सत्रात भाग घेतला.

Pune : ‘व्यथांची वादळे’चे लोकार्पण

दक्षिण मुख्‍यालयाचे लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह , एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, जीओसी-इन-सी, यांनी या प्रसंगी आपल्या भाषणात सर्व पदस्थांना  त्यांच्या आंतरिक निरामयतेचे प्रमाण वाढविण्यासाठी  योग आणि ध्यानाच्या पारंपरिक भारतीय पद्धतींशी जोडले जाण्याचे आवाहन केले.

हात, यम (सकारात्मक/योग्य वृत्ती आणि कृती), नियम (शिस्त आणि दिनचर्या), आसन (शारीरिक व्यायाम), प्राणायाम ( धावणे/एरोबिक व्यायामा दरम्यान सक्रिय श्वास), प्रत्याहार (वारंवार हालचालींमुळे आसक्ती नसणे), धारणा (गोळीबार करताना  अनुभवलेली एकाग्रता),  हे  ध्यान (ध्यान) आणि समाधी (अस्तित्व असणे ) या उच्च स्तरावर जाण्यासाठीचे पाऊल असू शकते, असा पुनरुच्चार त्यांनी केला. निस्वार्थ आनंद मिळवण्यासाठी या क्षणी  पूर्ण जागरूकतेने जीवन जगण्याची प्रेरणाही त्यांनी उपस्थितांना दिली

योगाभ्यासाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि नागरी आणि संरक्षण क्षेत्रातील  बंधुत्वाचे बंध बळकट  करण्यासाठी राजस्थान आणि गुजरातमधील लॉन्गेवाला, तनोट, घोटारू, किशनगड, भुज आणि लखपत येथे दुर्गम सीमावर्ती ठिकाणीही योग सत्रे आयोजित करण्यात आली होती. या सत्रांच्या माध्यमातून  गणवेशधारी कर्मचारी आणि नागरिकांनी  योगासनांचा लाभ घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.