Wakad : वाकड मंडई शेजारी अतिक्रमण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – प्राधिकरणाने बांधलेल्या वाकड येथील भाजी मंडई लगत झोपडी बांधून अतिक्रमण केल्याप्रकरणी तिघांवर वाकड (Wakad) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .हा प्रकार मंगळवारी (दि.20) उघडकीस आला.

Pune : लष्कराच्या दक्षिण मुख्‍यालयाअंतर्गत 30 केंद्रांमध्ये योग दिवस साजरा

याप्रकरणी विकास सत्यवान वाघमारे (वय 52 रा. रावेत) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्यादी असून अंकुश राजाराम चिंचोके (वय 37) देविदास सखाराम चिंचोके (वय 35) रामसिंग चिंचवड या (वय 45) सर्व राहणार वाकड भाजी मंडई शेजारी यांच्यावर अतिक्रमण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी  मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास प्राधिकरणाने बांधलेल्या भाजी मंडई लगत मोकळ्या जागेत पाच ते सहा कापडी झोपड्या बांधून अतिक्रमण करत तेथे राहत होते यावरून त्यांच्यावर वाकड (Wakad )पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.