Chinchwad : चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 100% 

एमपीसी न्यूज : चिंचवडच्या (Chinchwad)  विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाने एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत उत्तुंग यशाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यालयाचा निकाल दणदणीत 100% लागला असून तब्बल 45 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. संस्कृत विषयात 11 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळाले असून गणित विषयात एका विद्यार्थ्याने 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत.

Chinchwad : चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 100% 

विद्यालयातील यशाचे मानकरी –
1) साहिल रामदास टावरे ( 96.80%)
2) संस्कृती शिवाजी दाते ( 96.20%)
3) निनाद संतोष विश्वासराव ( 95.80% )
4) ऋतुजा अमोल मांडेकर ( 95.20% )

5) ऐश्वर्या उमेश थोपटे ( 95.00% )
संस्थेचे संस्थापक आदरणीय कै. आण्णासाहेब जाधव यांनी सुरू केलेली ही उत्तुंग यशाची परंपरा याही वर्षी विद्यालयाने कायम राखत हे घवघवीत यश प्राप्त केले. संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाचे यथोचित शब्दात कौतुक केले आणि भावी आयुष्यातील वाटचालीकरिता मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे वर्गशिक्षक सुषमा संधन, प्रतिभा साबळे, रमेश ढवळे, फौझिया मोमीन, प्रदीप रोटे आणि सर्व विषयशिक्षकांचे त्यांच्या उत्कृष्ठ आणि यशस्वी मार्गदर्शनाबद्दल त्यांनी विशेष शब्दांत कौतुक केले.
विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताकरिता उपलब्ध करून दिलेल्या विविध शैक्षणिक तथा भौतिक सुविधांचा विद्यार्थ्यांच्या या यशात पुरेपूर उपयोग झाला, असे सदर प्रसंगी ते म्हणाले. संस्थेचे सचिव संजय जाधव आणि संचालक विजय जाधव तथा अमित बच्छाव यांनीही विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना भावी आयुष्यातील वाटचालीकरिता यथोचित मार्गदर्शन केले. विविध विषयांच्या नावीन्यपूर्ण आणि अत्याधुनिक प्रयोगशाळांचा विद्यार्थ्यांच्या यशात खूप महत्त्वाचा वाटा आहे, असेही याप्रसंगी ते म्हणाले. मुख्याध्यापक  बाळाराम पाटील, साहेबराव देवरे, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, किसन अहिरे यांनीही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
पालकांनी विद्यालयाच्या शिस्तबद्ध नियोजनाबद्दल सदर प्रसंगी भरभरून कौतुक केले आणि विद्यालयातील उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या यशात पुरेपूर उपयोग झाल्याचे समाधानही व्यक्त केले. भविष्यात हे विद्यार्थी देशातच नव्हे, तर परदेशातही विद्यालयाचा नावलौकीक वाढवतील, अशी ग्वाही पालकांनी शालेय व्यवस्थापनास दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.