PCMC :  ‘ही’ सात गावे महापालिकेत समाविष्ट होणार? नऊ वर्षांनंतर पुन्हा चर्चा

एमपीसी न्यूज – गहुंजे, जांबे, मारूंजी, हिंजवडी, माण, नेरे आणि सांगवडे या ( PCMC ) शहराजवळील सात गावांचा महापालिकेत समावेश करावा, यासाठी 2015 मध्ये महापालिकेच्या सभेत ठराव झाला. मात्र, याबाबत गेल्या नऊ वर्षांत सात गावांच्या प्रस्तावावर शासनाने कोणताच निर्णय घेतलेला नाही. आता उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सात गावे समाविष्ट करण्याबाबत निर्णय झाला आहे. त्याची घोषणा लवकरच केली जाईल असे सांगितले आहे. त्यामुळे या गावाच्या समावेशाची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. 

पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आणि भोसरी या चार ग्रामपंचायतीचे क्षेत्र एकत्र करून 4 मार्च 1970 रोजी पिंपरी-चिंचवड या नगरपालिकेची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर 11 आक्‍टोबर 1982 रोजी महापालिकेची स्थापना करण्यात आली. अल्पवधीतच मोठ-मोठ्या उद्योगांकडून कररुपाने मिळणाऱ्या भरघोस उत्पन्नामुळे आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने नावलौकिक मिळविला. त्यावेळी महापालिकेत पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, पिंपळे निलख आणि वाकड अशा नऊ गावांचा समावेश होता.

Pune : छापा टाकण्याच्या बहाण्याने व्यवस्थापकानेच केले पाच किलो सोन्याचे तर 50 किलो चांदीचे दागिने लंपास

शहरात औद्योगिक कंपन्यांची मोठी भर पडत होती. त्यामुळे महापालिकेच्या परिसरात लोकवस्ती वाढत असतानाच महापालिकेची 11 सप्टेंबर 1997 मध्ये पुन्हा हद्दवाढ झाली. तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी, चऱ्होली, दिघी, बोपखेल, दापोडी, मामुर्डी, किवळे, रावेत, पुनावळे आदी गावे महापालिकेत आली. त्यानंतर 2009 मध्ये ताथवडे गावचा महापालिकेत समावेश झाला.

शहरातील उद्योग, व्यवसायाबरोबरच हिंजवडी आणि तळवडे आयटी पार्कमुळे शहरात वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांचा ओढा वाढला. त्यामुळे शहर चारही बाजूला मोठ्या झपाट्याने वाढत आहे. शहरात सध्या 6 लाख 15 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. शहरातील महापालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या मुलभूत सुविधा, शहरातील प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, उद्याने आदी सुविधा या उच्च दर्जाच्या आहेत. त्यामुळेच आशिया खंडातील सर्वाधिक झपाट्याने वाढणाऱ्या शहरामध्ये पिंपरी-चिंचवडचा वरचा क्रमांक ( PCMC ) लागतो.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.