Pune : छापा पडणार असल्याच्या बहाण्याने व्यवस्थापकानेच सराफ दुकानातून केला सव्वा दोन कोटीचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – सराफ दुकानात प्राप्तीकर विभागाचा छापा पडणार ( Pune)  असल्याच्या बहाण्याने व्यवस्थापकानेच पाच किलो सोन्याचे दागिने आणि 50 किलो चांदी असा सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचा ऐवज चोरून नेला. हडपसर परिसरातील माळवाडी रस्त्यावरील वसुंधरा ज्वेलर्स या सराफ दुकानामध्ये हा प्रकार घडला.

याबाबत ज्योतिरादित्य ऊर्फ यश राजेंद्र मोकाशी (वय 22, रा. बाणेर रस्ता, औंध) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्यवस्थापक विनोद रमेश कुलकर्णी (वय 35, रा. लोणी काळभोर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 12 मार्च  ते 8 फेब्रुवारी या कालावधीत घडला.

Pune : नवले पुलाजवळ डंपर आणि ट्रॅव्हल्सचा अपघात, सात जण जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्योतिरादित्य यांनी दोन वर्षांपूर्वी सराफ व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्याकडे आरोपी विनोद कुलकर्णी दुकानात व्यवस्थापक म्हणून कामास होता. यश यांनी दागिने घडविण्यासाठी पाच किलो सोने आणि 85 किलो चांदी खरेदी केली होती. त्यांनी सोने, चांदी व्यवस्थापक कुलकर्णी याच्याकडे दिली होती. त्यानंतर यश उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.

यश मागील डिसेंबरमध्ये पुण्यात परतले. त्यावेळी त्यांना दुकानात पावणेतीन किलो सोने आणि 50 किलो चांदी कमी असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत कुलकर्णीकडे विचारणा केली. त्यावर कुलकर्णीने सात फेब्रुवारीला सर्व सोने, चांदी परत करून हिशेब देतो, असे सांगितले. त्यानंतर 8 फेब्रुवारीला कुलकर्णीने सकाळी सराफ दुकानातील कर्मचाऱ्याशी मोबाईलवर संपर्क साधला. त्याने मालकाला हिशेब द्यायचा आहे.

तसेच, सराफ दुकानात प्राप्तिकर विभागाचा छापा पडणार असल्याचे सांगितले. त्यानंतर कुलकर्णीने सराफ दुकानातील कर्मचाऱ्यांकडून उर्वरित सोने आणि चांदी घेतले आणि तो पसार झाला. कुलकर्णीने पाच किलो, 50 किलो चांदी आणि दोन लाखांची रोकड अशी एकूण सव्वादोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हडपसर पोलीस पुढील तपास करत ( Pune)  आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.