Nigdi : आपचा निगडी पोलीस ठाण्यात हळदी कुंकवाचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज – निगडी पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी ( Nigdi) आणि अंमलदारांसोबत आम आदमी पार्टी, मातोश्री रमाबाई महिला बचत गट गंगानगर प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने, आप शहराध्यक्ष मीना जावळे यांच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी आप शहराध्यक्षा मीना जावळे, ज्योती शिंदे, कल्याणी चाकणे, नूर जहान मुलानी, सुजाता बनसोडे, करुणा कांबळे, वैशाली ओव्हाळ व आम आदमी पार्टीच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

PCMC :  ‘ही’ सात गावे महापालिकेत समाविष्ट होणार? नऊ वर्षांनंतर पुन्हा चर्चा

निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. नागरिक आणि पोलीस यांचे मैत्रीपूर्ण संबंध असले पाहिजेत. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. अनेकांना पोलिसांची भीती वाटते. मात्र अशी भीती न बाळगता नागरिक आणि पोलीस यांच्यात मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होईल. समाजाच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक असल्याचेही कदम यांनी ( Nigdi)  सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.