Pune : गरीब मुलीवरील उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

एमपीसी न्यूज- एका आर्थिकदृष्टया गरीब असलेल्या कुटुंबातील मुलीवर मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले आहे. तिच्यावरील पुढील उपचारासाठी एक लाख रुपयाची गरज आहे. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने आर्थिक मदत करावी असे आवाहन कारण्यात आले आहे.

पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात सुगुणा अंजनयेल्लू उपलवण या १६ वर्षाच्या मुलीवर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात
आली आहे. पुढील उपचारासाठी तिला एक लाख रुपयाची गरज आहे. सुगुणा हिचे वडील अंजनयेल्लू उपलवण हे बिगारी काम करतात व आई लक्ष्मी उपलवण
या घरकाम काम करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे एवढा मोठा खर्च त्यांना करणे शक्य नाही.

तरी यासाठी समाजातील दानशूर, धनवान व्यक्ती वा संस्था यांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात द्यावा. मदतीसाठी देण्यात येणार धनादेश डॉ. डी वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेन्टर या नावाने पुढील पत्तावर पाठवावा असे आवाहन करण्यात येत आहे.

डॉ. डी वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेन्टर,
संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे ४११ ०१८,
ऑनलाईन पैसे पाठवायचे असल्यास

आंध्र बँक खाते क्र 111710011000540 शाखा : पिंपरी
आयएफएससी कोड ANDB 0001117,
एमआय सी आर 411011003

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.